Home ताज्या बातम्या ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

0

ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न

ब्रह्माकुमारी संस्थेच्या सहमुख्य संचालिका ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी यांनी दिले शुभाशीर्वाद

नाशिक – येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मुंबई नाका, सुचिता नगर येथील सेवा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आशीर्वचन देण्यासाठी मुख्यालयातून संस्थेच्या सहमुख्या प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदी जी उपस्थित होत्या.
ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी या गेल्या 55 वर्षांपासून ईश्वरीय कार्यात समर्पित आहेत. आज मितीस दीदी जी यांनी महाराष्ट्रातील अनेक सेवा केंद्र मध्ये आपली सेवा देत त्या गेल्या 40 वर्षांपासून नाशिक जिल्ह्याचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत.

 

वयाच्या 79 वर्षीही दीदीजी खूप क्रियशील असून आपली सर्व कामे वेळेच्या वेळी व्हावीत यासाठी त्या आग्रही असतात. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ईश्वरीय ज्ञानाने संपन्न करून त्याच्या जीवनात सुख शांती कशी येईल यासाठी दीदीजी नेहमीच प्रयत्नशील असतात. दीदींच्या अमृतवाणीतून आजपर्यंत अनेकांनी आपले व्यसन त्यागली, अनेकांनी तणामुक्त जीवनाचा आस्वाद घेतला तर अनेकांचे ईश्वरी कार्यात जीवन उज्वल बनले आहे. अशा अलौकिक ईश्वरी ज्ञानाच्या संपन्न ईश्वरी ज्ञानाच्या धनी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातूनच काय पण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या सेवाकेंद्र मधून दिदिजी वर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.


दीदींजीनचा अभिष्टचिंतन सोहळा मुंबई नाका येथील सुचिता नगर सेवा केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेच्या ब्रह्माकुमारी शक्ती दीदी ब्रह्माकुमारी मनीषा दीदी ब्रह्माकुमारी विना दीदी ब्रह्माकुमारी उज्वला दीदी ब्रह्माकुमारी कावेरी दीदी आदी समर्पित भगिनींसहित डॉक्टर उज्वल कापडणीस डॉक्टर मनीषा कापडणीस व त्यांचा म्युझिकल योगा परिवार सुद्धा उपस्थित होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version