श्री बालाजी देवस्थानचा वार्षिक ब्रह्मोत्सव…. विविध धार्मिक कार्यक्रम….
नाशिक रोड शिखरेवाडी ग्राउंड जवळ असलेले श्री बालाजी देवस्थानचा वार्षिक ब्रहोत्सव सोमवार 21 एप्रिल पासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 21 एप्रिल ते गुरुवार 24 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २१ एप्रिल रोजी स. ७:०० वा. पंचामृत अभिषेक, विशेष अलंकरण, नित्य आराधना, तीर्थगोष्टी आणि सायं. ५:०० वा. अंकुरारोपण व भूदेवी पूजन सायंकाळी ६:३० वा. आचार्य महंत कालिकानंदजी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. मंगळवार २२ एप्रिल रोजी स ७:०० वा. विश्वक्सेन पूजा, पुण्याहवाचन, पंचगव्य आराधना, पंचगव्य प्राशन, अग्रिमंथन, सर्वाग्रिकुण्डेषु आधार प्रयोग, ध्वजारोहण, आरती, मंत्रपुष्पांजली, ध्वजारोहण व पूजन, तीर्थ प्रसाद ठेवण्यात आले असून सायं. ६:०० वा. स्वामी संविदानंद सरस्वती महाराज, महंत १००८ गिरीजानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदासजी महाराज आदी संत महंतांच्या उपस्थितीत शोभायात्रा व श्री बालाजी उत्सव मूर्ती ग्राम प्रदक्षिणा होणार आहे.
श्री बालाजी मंदिर, शिखरेवाडी नंदन पार्क गंधर्व नगरी बिटको फॅक्टरी, एल.आय.सी. रोड श्री बालाजी मंदिर, शिखरेवाडी अशी ग्राम प्रदक्षिणा निघणार आहे. बुधवार २३ एप्रिल रोजी
स ७:०० वा. विश्वक्सेन पूजा, पुण्याहवाचन, आरती, मंत्रपुष्पांजली हवन व पूजन आणि सायं. ६:०० वा. कल्याणोत्सवम्, आशिर्वचनम्, नैवेद्यम्, आरती श्री बालाजी विवाह सोहळा व महाप्रसाद ठेवण्यात आले आहे.
गुरुवार २४ एप्रिल रोजी स. ७:०० वा. चक्रस्नानम् व पूर्णाहुती सायं. ५:०० वा. बालाजी मंदिर परिक्रमा व शयन उत्सव असून सायंकाळी ६:३० वाजता माधवदास राठी महाराज श्रीक्षेत्र तपोवन, पंचवटी, नाशिक यांचे प्रवचन होणार आहे. श्री बालाजी देवस्थान वार्षिक ब्रह्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भाविकांनी कार्यक्रमाचा सत्संगाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी सोशल फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.