बिटको महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ वी जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण …..
” भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण, विचार, मूल्य, तत्वे अंमलात आणुन त्यांना प्रिय असणारी समता , अभिव्यक्त स्वातंत्र्य व बंधुत्व ही लोकशाहीची तत्व तसेच मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्धार करून चंद्र सूर्य यांना जितके आयुष्य आहे तितके महत्व राज्यघटनेला आहे. तेव्हा सुजाण नागरिक बनून वाचनाचा अंगीकार करा ,”असे प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महाविद्यालयातील ग्रंथालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे , विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.आकाश ठाकूर,ग्रंथपाल एस. व्ही. चंद्रात्रे यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. त्यानंतर मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात येउन त्रिशरण व पंचशील सामुदायिक बुद्धवंदना म्हणण्यात आली. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ.के. एम. लोखंडे यांनी मार्गदर्शन करताना युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन कार्याला उजाळा देतांना त्यांच्या शिक्षण, न्यायव्यवस्था ,कायदा ,संघराज्य रचना, स्रीयांचे प्रश्न, कामगाराचे अधिकार अशा विविध क्षेत्रातील घटनेतील क्रांतिकारक निर्णयांबाबत माहिती दिली. जयंतीच्या निमित्त ग्रंथालयात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य व इतर पुस्तके वाचनासाठी ठेवण्यात आली आहेत . यावेळी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे , ग्रंथपाल एस. व्ही. चंद्रात्रे, डॉ. आरती गायकवाड, श्री. धोंडोपंत गवळी यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी कार्यक्रमास डॉ. दिनेश बोबडे, डॉ.विलास कांबळे, डॉ संतोष पगार, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रा. दीपक टोपे, प्रा. सचिन बागुल, मराठी विभागप्रमुख डॉ. सुदेश घोडेराव, संजय परमसागर, कुलसचिव राजेश लोखंडे, कार्यालय अधीक्षक मुकुंद सोनवणे, आकाश लव्हाळे, पंकज थेटे, अनिल गोरे, स्नेहा देशमुख यासह तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.