नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात युवकाची हत्या…..
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात युवकाची हत्या करण्यात आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीने कहर केला असून खुनाचे सत्र थांबता थांबत नाही.
पोलिसांचे आणि कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही का असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत. रविवारी रात्री साडे दहा वाजेचा सुमारास पांडवलेणी येथील ज्ञानपीठ सोसायटी जवळ दारू आणि जुन्या वादातून चार ते पाच जणांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. रामदास बोराडे (वय १९ असे या तरुणाचे नाव असून तलवारीच्या हल्ल्यातुन त्याचा खून झाला, तर राजेश बोराडे गंभीर जखमी आहेत.
टोळक्याकडून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची देखील केली तोडफोड करण्यात आली. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.