नाशिकला अवैध सावकारांविरोधात कारवाई….. धाडीत कोरे स्टॅम्प, कोरे चेक जप्त…..
नाशिकला अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर करण्यात आली असून अनेक ठिकाणी धाडीत कोरे चेक, कोरे स्टॅम्प आदी जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदयान्वये कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.
यापुढे देखील पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर हहीत अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.05 एप्रिल रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमनवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडवर व उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, नाशिक येथील सहा. उप निबंधक अधिकाऱ्यांनी नैय्या खैरे, राजेंद्र जाधव, कैलास मैंद, निलेश आल्हाट, संजय शिंदे, प्रकाश अहिरे, गोलुभाई कांदे, सुनिल पिंपळे, जुबेर पठाण, गोकुळ धाडा, धनु लोखंडे, कैलास मुदलीयार, सचिन मोरे व किरण मोरे यांच्या राहत्या घरी जावुन घरझडती घेवुन कारवाई केली.
कारवाईत करारनामे, कोरे चेक, खरेदीखत, लेजर बुक, पैसे मोजण्याची मशीन, रजिस्टर कागदपत्रे, रोख रक्कम, अमेरिकन डॉलर, कब्जा पावती, हात उसनवार पावत्या जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
गुरूदेव कांदे, जुबेर पठाण, कैलास मुदलीयार, सचिन मोरे, रोहित चांडोळे यांच्या राहत्या घराची घरझडती घेतली असता ते अवैध सावकारी व्यवसाय करीत असलेबाबत कोणत्याही प्रकाराचा पुरावा मिळुन आले नाही.
अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर तक्रार देण्यासाठी पुढे येवुन त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय, के.टी.एच.एम. कॉलेज समोर, गंगापुर रोड, स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.