Home ताज्या बातम्या फिल्म फेस्टिवल होणे नाशिककरांसाठी अभिमानास्पद! – कृषिमंत्री कोकाटे नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल...

फिल्म फेस्टिवल होणे नाशिककरांसाठी अभिमानास्पद! – कृषिमंत्री कोकाटे नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल उत्साहात सुरू… महाराष्ट्र व देश विदेशातून कलावंतांचा मोठा सहभाग

0

फिल्म फेस्टिवल होणे नाशिककरांसाठी अभिमानास्पद! – कृषिमंत्री कोकाटे
नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल उत्साहात सुरू… महाराष्ट्र व देश विदेशातून कलावंतांचा मोठा सहभाग

 


नाशिक फिल्म फेस्टिवल हा महोत्सव होणे नाशिककरांसाठी महत्त्वाची व मानाची बाब आहे. अकरा वर्षापासून हा फेस्टिवल आपल्या नाशिक मध्ये होत आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे . या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून देश व विदेशातून सुद्धा कलावंत येथे उपस्थित झालेले आहेत, या सर्वांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत आहे. संध्याकाळी सुद्धा दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असणार तो सुद्धा भव्य दिव्य होईल यात शंका नाही. मुकेश कणेरी व त्यांच्या टीमने खूप चांगले कार्य केलेले आहे हे कार्य अधिक उत्साहाने घडत जावे याच शुभेच्छा, अशा शब्दात मा. नामदार माणिकराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


येथील कॉलेज रोड स्थित गोखले एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये दिनांक 29 मार्च रोजी 11वा. नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला. यात देश विदेशातून आलेल्या विविध चित्रपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मा. नामदार माणिकराव कोकाटे , कृषी मंत्री. बोलत होते.दीप प्रज्वलनानंतर मूवीची क्लॅप मारून मारून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजय बोरस्ते (उपनेता शिवसेना), ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रिय संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी, विनोद तिवारी (कॅनडा-फिल्म मेकर आणि मेंटर फॉर फिल्म education).श्री लक्समणजी साऊजी (प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र राज्य) श्री बबन घोलप (माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य), श्री प्रकाश बनकर (जिल्हा अध्यक्ष मराठा बिसिनेस फोरम.), श्री संदीप सोमवंशी (संस्थापक ग्लोबिझ फोरम), श्री रमेश धोंगडे (माजी नगरसेवक.),श्री उज्वल निरगुडकर (ऑस्कर अकादमी वोटिंग मेंबर), एस जे जननी (ग्रामी वोटिंग मेंबर), सुजॉय मुखर्जी (डायरेक्टर हुन्नर मूवी), ब्रह्माकुमारी प्रभा मिश्रा निर्मात्या व ब्रह्माकुमार पंपोष मिश्रा (महामहीम दीदी मुरमु चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक), द लाईट चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक ब्रह्माकुमारी शिखा आदी मान्यवर उपस्थित होते.


या चित्रपट महा कुंभामध्ये जवळजवळ 12 चित्रपट दाखवण्यात आले. यात ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे बनवण्यात आलेला महामहीम दीदी मूर्मू या चित्रपटाला प्रदर्शित होण्याचा प्रथम मान मिळाला. याप्रसंगी या चित्रपटाच्या निर्मात्या ब्रह्माकुमारी प्रभा मिश्रा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या जवळ काहीही नसेल परंतु फक्त निश्चय जिद्द सचोटी व सातत्य या गुणांच्या बळावर आपण जगातील कोणतीही गोष्ट संपादन करू शकतो या जगात काहीही अशक्य नाही हीच गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. चित्रपटाला नाशिक मध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिल् याबद्दल ब्रह्माकुमारी प्रभा मिश्रा यांनी संपूर्ण ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजकांचे आभार मानले.दिग्दर्शक ब्रह्माकुमार पंपोष यांनी सांगितले की महामहीम द्रोपदी मुर्मू यांचे जीवन आध्यात्मिक जीवन आपल्यासाठी आदर्शवत आहे. त्यांच्या या जीवनातून आपल्याला खूप साऱ्या प्रेरणा मिळतात. त्यांच्या जीवनात अनेक हलाखीचे प्रसंग आले त्यावेळेस महामहीम द्रोपदी मुर्मू या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या काळात त्यांना ब्रह्माकुमारी संस्थेचा आसरा मिळाला व तेथून त्यांनी आपल्या जीवनाला कशी कलाटणी दिली याचे मूर्तीमंत चित्रण या चित्रपटात केले आहे. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित व्हावा यातून सर्वांना प्रेरणा मिळावी अशी अशा ब्रह्मकुमार पंपोष मिश्रा यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.


श्री बबन राव घोलप (माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमी व कर्तृत्व भूमीमध्ये हा कार्यक्रम करताना आम्हाला फार अभिमान वाटतो जगभरातील चित्रपट या महोत्सवामध्ये समावेश होतात. मागील महोत्सवात 447 चित्रपट समावेश झाले होते. मात्र स्थानिक नाशिककरांचा पाहिजे तसा प्रतिसाद या महोत्सवाला लाभलेला दिसत नाही याची खंत माजी आमदार बबनराव घोलप यांनी येथे व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. रेवा कनेरी डॉ. दीपा व सिमरन आहूजा यांनी तर उत्कृष्ट व्यवस्थापन बी एम एस कंपनीचे संदीप सोमवंशी यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version