चेट्रीचंड भगवान झुलेलाल यांची अवतरण इतिहास…. १०७५ वा अवतरण महोत्सव……
संकलन : महेश लखवानी
सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य कुळ दैवत भगवान पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेट्रीचंड उत्सव का व झूलेलाल कोण? यामागची अख्यायिका काय? याबाबत फारच थोडे माहीती आहे म्हणून हा लेख लिहिण्याचे हे कारण आहे.
सिंधी समाज हिंदू कॅलेंडर विक्रम संवत हिंदू राजा विक्रमादित्य यांच्या आधारावर चालते व सिंधी समाजाच्या महिन्यांची नववर्षाची सुरूवात चैत्र महिन्याने होते व सिंधी समाजामध्ये याला “चेट” असे म्हणतात व चेट्रीचंड हा पवित्र दिवस सिंधी समाजाचे कुलदैवत पुज्य झुलेलाल यांचाही अवतरण जन्मदिवस आहे म्हणूनच हा दिवस सिंधी समाजासाठी खास असतो. भारताच्या इतिहासात वीर छत्रपती शिवाजी महाराज पंजाबचे महान गुरू गोविंदसिंह, राजस्थानचे बहादुर महाराणा प्रताप सिंह यांचे नाव ज्याप्रकारे आदर, सन्मान व श्रध्देने घेतले जाते त्याच प्रकारे सिंध प्रदेशातील वीर झुलेलाल यांचे नाव सन्मान आणि श्रध्देने घेतले जाते. या महापुरूषांनी हिंदू धर्म संस्कृतीची रक्षा करून जी संजीवनी प्रदान केली, त्यामुळे हजारो वर्षानंतर आज सुध्दा सर्व हिंदू धर्माच्या रंगमंचावर महान अमर आहेत.
गीतेतील” यदा यदाहिं धर्मरय…” या श्लोकानुसार दमन आणि अत्याचाराची जेव्हा पराकाष्ठा झाल्याने जेव्हा सिंधमध्ये धर्मरक्षणार्थ ‘पुज्य झुलेलाल यांनी अवतार घेतला तेव्हा नरातुन नारायण च्या श्रेणीतले अमरपद त्यांना सहज मिळाले. पुज्य झुलेलाल यांनी मिर्ख बादशहाचे पतन आपली नववी शक्ती व थल शक्ती द्वारे केले होते. इतिहासात या गोष्टीचे अनेक उल्लेख आहेत की वीर उडेरोलाल यांनी आपल्या नौसेनेचा बादशहावर जबरदस्त दरारा प्रस्थापित केला होता. वीर उडेरोलाल यांचे एक वैशिष्ट्य हे पण आहे की त्यांनी मिर्ख बादशहाचा पराभव करून सुध्दा त्याला जीवदान दिले होते. आपल्या परम मानवीय व उदार दृष्टीकोणामुळे त्यांना जी कीर्ती व प्रसिध्दी लाभली होती त्याचाच परिणाम की सिंध प्रांतामध्ये वीर उडेरोलाल यांना देवत्वाचे महत्व प्राप्त झाले व ठिकठिकाणी अमरलाल यांचे मंदिर बांधण्यात आले. जिथे हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक भक्तिभावाने पुजा अर्चा करू लागले. मिर्ख बादशहावर उडेरोलाल यांचा विजय अमानवी मुल्यांविरूध्द मानवी दानवी शक्ती विरुध्द दैवी व अधर्मावर धर्माचा विजय होता म्हणून दरवर्षी चैत्र महिन्यात पुज्य झुलेलाल यांचा अवतरण जन्मदिवस आनंद व उत्साहात साजरा केला जातो.
असा सुध्दा उल्लेख आहे की वीर उडेरोलाल यांनी आपल्या थल सेनेची स्थापना केली होती. याचे सर्वात मोठे प्रमाण हे आहे की जे उडेरोलाल यांनी मिरख बादशहावर आक्रमण केले तेव्हा त्यांनी हिंदूंना आदेश दिले की, आपल्याकडील सर्व शस्त्रे लपवून ठेवा व हातात फक्त दान्डीया (छेज)घेऊन नाचत गाजत चालण्यास सांगितले व वेळ आल्यावर आपल्याकडील शस्त्रे अचानक काढून मिर्ख याच्या सेनेवर आक्रमणासाठी सज्ज राहण्यास सांगितले. याच कारणाने लोकांना माहित आहे किंवा नाही हिंदूसिंधी भक्त आज सुध्या यादिवशी आपल्या हातात दान्डीया घेवून आपसात नाचत गाजत ढोलताशाच्या गजरात पूज्य झुलेलाल यांच्या बहिराना साहिब सोबत नाचत गाजत जन्मोत्सव उत्साहाने साजरा करतात. मराठी नववर्षाची सुरूवात चैत्र महिन्याच्या ‘गुढीपाडव्याने’ होते.
त्याचवेळी सिंधी बांधव ‘चेट्रीचंड” उत्सव साजरा करतात. सिंधमध्ये असतांना सिंधी बांधव चेटीचंड हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असत. फाळणी झाल्यानंतर आजतागायत हा महा उत्सव जगभर साजरा होत आहे. त्यानंतर भाविकांनी चाळीस दिवसांचा आपला उपवास सोडला. आज सुद्धा हा उपवास पर्व चालीहा महोत्सव म्हणून साजरा केला जातो.
मिर्ख बादशाह अत्याचारी होता आणि हिंदूंना असा आदेश दिला की त्यांनी इस्लाम धर्माचा स्विकार करावा, ज्यामुळे मला त्यांच्यावर अत्याचार करावे लागणार नाहीत. यावर ते बालक गंभीर आवाजात म्हणाले की, ‘अरे मिरख! धर्म कोणताही असो, सर्व धर्म उच्छृंखल मानव जातीला नियंत्रित करण्यासाठी आहेत. तुझ्या दृष्टीने त्यांच्यात भिन्नता असेल, परंतु ईश्वर म्हणा की खुदा त्यांच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम यांच्यात काहीच फरक नाही, जसे एकाच नगरात जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात कोणी कोणत्याही मार्गाने नगरात प्रवेश करू शकतो. तसेच हे विविध धर्म परमात्म्याच्या नगराला मिळणारे आहेत असे सांगून अवतारी बालक अदृश्य झाला.
मुस्लिम बादशहाला देखील हे बालक देवी असल्याचा प्रत्यय आला. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांनी बालक उदयराजला विद्वान पंडितांकडे पाठविले व थोड्याच कालावधीत त्या अवतारी बालकाने विद्याभ्यासासह सर्व शास्त्रे व कलांमध्ये प्राविण्य मिळविले. विद्याभ्यास पूर्ण करून लाल उदयराज घरी आले तेव्हा ते १३ वर्षाचे होते. सावत्र आईच्या सांगण्यावरून वडिल रतनराय यांनी कुळधर्मानुसार चणे फुटाणे विकण्याचे काम उडेरोलाल यांच्यावर सोपविले. उदयराज चणे फुटाण्याची थाळी समुद्राला अर्पण करीत व ती थाळी समुद्राकडून त्यांना धनाने भरून मिळत असे. वडिलांनाही हा चमत्कार पाहिल्यावर त्यांना कळून चुकले की हा मुलगा परमपिता परमात्मा आहे.
त्यांनी उदयराजला त्या दिवसापासून चणे विकण्यास मनाई केली तरीही उदयराज नेहमी समुद्राकाठी जात असत, स्नान व ध्यानोपासना करून परत येत असत. भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लिला मित्रांना सांगत. एके दिवशी त्यांची भेट अमरयोगी गुरु गोरक्षनाथांशी झाली व त्यांना नम्रपणे विनंती केली की, हे नाथ! मला गुरुमंत्र देऊन आपला शिष्य बनण्याची कृपा करावी. योगी गोरक्षनाथ खळखळून हसले. जसे संदीपनी ऋषी दुर्वासमुनी आणि गार्गाचार्यांनी श्रीकृष्णाला ओळखले अगदी तसेच या अवतारी पुरुषाला त्यांनी सहजपणे ओळखले आणि ते म्हणाले, तुम्ही स्वतः परमस्वरूप आहात, सर्वव्यापी देवाधीदेव आहात.तरीही गुरूशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. दोघांमध्ये गुरू शिष्याचे अंतर राहता कामा नये असे म्हणून लाल उदयराजांना मंत्रदिक्षा दिली आणि आशिर्वाद दिला की तुम्ही अमरलाल या नावाने प्रसिध्द व्हाल आणि भक्त तुमची जिंदहपीर या नावाने पूजा करतील. उदयराज सर्वत्र भ्रमण करीत लोकांना उपदेश देऊ लागले. त्यांच्या उपदेशाचा सार असा होता की, सर्वांनी सगुण निर्गुणांची उपासना करावी. अनेक वर्ष उपदेश दिल्यानंतर दर्यालाल यांच्या नव्या भक्ती पंथाचा श्रीगणेशा झाला. त्यांच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम समान होते. त्यांच्या ओजस्वी वाणीने अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले. अग्नी व जल यांच्या उपासनेचे मर्म उडेरो राजांनी सर्वांना समजावून सांगितले. आपल्या अंतिम उपदेशाने उद्बोधीत करून उदयराज विरोचित वेशभुषेत अश्वरूढ होऊन अज्ञात ठिकाणी निघाले, कालांतराने ते जहेजा नामक ठिकाणी गेले. ती जागा एका जाट व्यक्तीची होती. उदयराजांनी जाट इसमाकडून ती जमीन मागितली. त्या जागेवर सल्ल्यानुसार खोदकाम केल्यावर तेथे पुष्कळ धनसंपत्ती मिळाली. जाट दाम्पत्य आश्चर्यचकीत झाले व त्यांनी ओळखले की उदयराज कोणीतरी चमत्कारी पुरुष आहेत. जाट दाम्पत्याने आम्हाला संपती नको तर आम्ही आपली सेवा करीत जीवन व्यतीत करू इच्छीतो अशी इच्छा व्यक्त केली.
उदयराजने तथास्तु म्हणत हातातील त्रिशुल जमिनीत गाडला व पाहता पाहता धरणी दुभंगली व त्यातून पाण्याचा लोंढा बाहेर आला, जणू काही घडलेच नाही अशा प्रकारे ते शांत भावाने त्या मार्गावर चालत पाताळात विलीन झाले. ही चमत्कारी घटना भक्त पुंगर व मिर्ख बादशहाला देखील ही बातमी कळताच त्याने वजिर आहास झडेनाला पाठवून त्या जागी पिरांचे पीर अमरलाल यांच्यासाठी एक भव्य ताबूत ‘काबा’ बनविण्याचे ठरविल्यावर त्यांच्यात य भक्त पुंगर यांच्या वाद झाला. तेवढ्यात आकाशवाणी झाली “माझ्यासाठी आपआपसात लढाई वादविवाद करू नका माझ्या दृष्टीने हिंदू मुस्लिम समान आहेत. शेवटी ताबूत बांधण्याचा व त्यावर अखंड ज्योतीची स्थापना करण्याचा निर्णय सर्वमान्य झाला. थोड्याच दिवसांनी अमरलाल सखरबखरेत प्रकट झाले. तेथे सिंधच्या मधोमध जिंदा पीर नावाने ताबूत बांधण्यात आला. जो तरबरा नावाने सुध्दा ओळखला जातो. २५ वे अवतार म्हटल्या जाणाऱ्या दर्यालालचा जन्मदिन चैत्र शुध्द व्दितीयेला सर्व दर्यास्थान आणि दर्यालयात साजरा करण्यात येतो.
सिंधी बांधव त्यांची पुजा झुलेलालच्या रूपात पुजा करतात आणि मुस्लिम त्यांना जिंदहपीर म्हणून भजतात. याप्रकारे उदेरोलाल दुलदर्याशाह झुलण जिंदह पीर यांनी आपल्या भक्तांचे रक्षण केले व संवत १०२० च्या चर्तुदशीला लालसाईनी जलसमाधी घेतली. खरोखरच दरिवालालच्या रूपात आपले अवतार कार्य पूर्ण करून लालउदयराज अमरलाल बनले. तेव्हा पासून जगभरात वसलेले सिंधी बांधव समाज प्रत्येक वर्षी ‘चेटीचंड’ आपले इस्ट देव उदेरोलाल झुलेलाल अवतरणा दिवशी ‘चेट्रीचंड’ ‘सिंधी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करतात. आपले व्यवहार बंद ठेवून सारे एकत्र जमतात व बहिराणा साहिबची पुजा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन लहान मंडळी मोठ्यांचे आशिर्वाद घेतात. सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढून संगीताच्या तालावर नाचत गात ‘आयोलाल झुलेलाल’ च्या गजरात दर्याशाहची ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करते. सिंध मध्ये ‘लाल ‘झुलेलाल’ कलंदर हिंदू व मुस्लिम मध्ये फारच प्रसिध्द आहेत. ‘लाल मेरी पत रखीयो भला’ हे गाणे सर्वच हिंदू, सिंधी, मुस्लिम भाविक भक्ती भावाने गातात. भगवंती नावाची प्रसिध्द सिंधी गायिका हिने हया गाण्याचे सिंधीत रूपांतर करून गायीले आहे ते जगभर प्रसिध्द आहे. लालसाईंच्या मिरवणूकीत उदेरोलाल झुलेलालची भव्य मुर्ती असते, लालसाई व अन्य सिंधी संत व देवीदेवतांचे वेश धारण केलेले देखावे आकर्षणाचे केंद्र असतात. नदी किंवा किनाऱ्यावर झुलेलालची आराधना गीते ‘पंजडा’ गातात आणि अख्खा तांदुळ, साखर, नदीत अर्पण करून समाजाच्या समृध्दीसाठी प्रार्थना करीत बहिराणा साहिबांचे श्रध्देने विसर्जन करतात. हा सण शेती उत्सवांपैकी एक आहे. विसर्जनानंतर सेसा प्रसाद वाटण्यात येतो व एकत्रित जमेलले भक्तगण प्रितिभोजन करतात. पदार्थांमध्ये विशेष ‘ताहिरी’ गोड भात व साईभाजी पालक चनाडाळ यांचा समावेश असतो.
संकलन :- महेश लखवानी