Home Uncategorized चेट्रीचंड भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस निमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…..

चेट्रीचंड भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस निमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…..

0

चेट्रीचंड भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस निमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम…..

नाशिक सिंधी समाज बांधवांतर्फे नवीन वर्ष व भगवान झुलेलाल यांचा अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने नाशिक, नाशिकरोड, उपनगर आणि देवळाली कॅम्प येथील पूज्य झुलेलाल मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. त्र्यंबकरोड एबीबी सर्कल जवळील डक्कर डोम येथे नाशिक सिंधी पंचायततर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दिवसभर चालणार्या या उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

रामी भवन येथे पुज्य बहिराणा साहेब स्थापना,  पुज्य झुलेलाल साई यांची आरती केल्यानंतर बाईक कार पारिवारिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातून निघणाऱ्या या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. भगवान झुलेलाल यांच्या पेहरावात भगवान मोटवानी या रॅलीतील रथावर सहभागी होतील. इतरही संतांच्या पेहेरवात कलाकार सहभागी होतील. रॅलीनंतर ठक्कर डोम याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मेळा कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार आहे. सकाळी ९ वाजता पूज्य बहिराणा साहिब पूजा, १० वाजेपासून रक्तदान शिबिर, ११ वाजता दी मा भगवान यांचे सत्संग, दुपारी लहान मुलांचे सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. जबलपूर येथील पुनीत डान्स ग्रुपचे कलाकार सिंधी गीतांवर रंगारंग कार्यक्रम सादर करणार येणार आहेत.

सायंकाळी पूज्य झुलेलाल मंदिर येथून जेलरोड, बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून भगवान पूज्य झुलेलाल यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याने भाविकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावे असे आवाहन श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळा तर्फे करण्यात आले आहे.

देवळाली कॅम्प येथे सिंधु सेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे झुलेलाल मंदिरात सकाळी बहिराना साहिब पूजा दुपारी बाईक रॅली नंतर महाप्रसाद, सायंकाळी देवळाली कॅम्प परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळातर्फे करण्यात आले आहे.


उपनगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरातही जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी परिसरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे त्यानंतर पूज्य बहिराना साहिब पूजा, दुपारी लहान मुलांचे सिंधी संस्कृतिक कार्यक्रम होणार असून रात्री भंडारा साहिब चे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत भाग घ्यावे असे आवाहन सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version