Home Uncategorized नाशिक पूणा महामार्गावर कृष्णा लॉन्स समोर युवकाचा कोयत्याने निर्घृण खून …. परिसरात...

नाशिक पूणा महामार्गावर कृष्णा लॉन्स समोर युवकाचा कोयत्याने निर्घृण खून …. परिसरात भीतीचे वातावरण……

0

नाशिक पूणा महामार्गावर कृष्णा लॉन्स समोर युवकाचा कोयत्याने निर्घृण खून …. परिसरात भीतीचे वातावरण……

नाशिक पूणा महामार्गावरील बोधले नगर जवळ कृष्णा लान्स समोर वखारी जवळ एका युवकाचा कोयत्याने खून करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तुषार चावरे या 22 वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. जखमी अवस्थेत  युवकाला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले परंतु  युवकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. चोऱ्या, खून, दरोडे सारखे घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शेवटी गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नाही. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version