सिंधी प्रीमियर लीगमध्ये सॉक्स अँड शुज संघ विजयी…..
देवळाली कॅम्प येथे संपन्न झालेल्या सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सॉक्स अँड शुज संघाने प्रकाश कलेक्शन संघावर आठ धावांनी मात केली. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर पूज सिंधी पंचायतीच्या सिंधी प्रीमियर लीगचे तीन दिवस क्रिकेट सामने भरविण्यात आले.
सोमवारी प्रकाश कलेक्शन व शॉक्स अँड शुज संघामध्ये अंतिम सामना क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. विजेत्या संघाला पूज्य सिंधी पंचायतिचे अध्यक्ष रतन चावला, नविन गुरुनानी, हिरो रेजवाणी, कन्हैयालाल आहुजा, विजय कुकरेजा, प्रितमदास खत्री, किशन अडवाणी आदींच्या हस्ते २५ हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या सघाला १५ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात आली याशिवाय इतर ही बक्षीस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आली. यावेळी परमजित सिंग कोचर, रवि सुगंध, राजु फल्ले, सुरेश आमेसर, राजु नागदेव, दिनेश नाहीलानी आदींसह पदाधिकारी सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.