Home क्राईम महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

महिलेचा विनयभंग…… चार बांधकाम व्यावसायिकांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल……

उपनगर पोलिस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक व विकासकांना सल्ला देणाऱ्या संचालिकेने कमिशनचे पैसे मागितले असता नकार देत अश्लिल शिवीगाळ व अंगाशी झटापट करत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. तपोवन रोडवरील ईश्वर प्रतिक ग्रँड या गृह प्रकल्पाच्या कार्यालयात विनयभंग झाल्याची घटना समोर आल्यानंतर उपनगर पोलिसांनी चौघा बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित आपल्या पार्टनरसह १६ वर्षांपासून मुंबईसह नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक व विकासकांना सल्ला देण्याचा व्यवसाय करतात. संशयित बांधकाम व्यावसायिक यांच्यात एक गृह प्रकल्पाच्या विक्रीचा करारनामा झाला होता.

त्यासाठी पिडितेला दोन टक्के कमिशन निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार २४ निवासी युनिट पिडीतेने विकल्या होते मात्र संशयतांनी पाच ते सहा युनिटची परस्पर विक्री केल्याने आपली फसवणूक होत असल्याचे पाहून पिडीतेने व्यावसायिकांकडे कमिशनच्या पैशांची मागणी केली असता तिला उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली.

पिडिता व पार्टनर यांना कार्यालयात बोलावून करारनाम्याची मूळ प्रत हिसकावून घेण्यात आली आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. तसेच अश्लिल शिवीगाळ करत ‘आम्ही नाशिकमधील टॉप लेवलची माणसे आहोत.

आमचे काम बिघडवणार. जा कोणाकडे जायचे ते’ असे बोलून पुन्हा कार्यालयात आलीस तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही देण्यात आली. घाबरलेल्या अवस्थेत पिडिता कार्यालयाबाहेर आल्यानंतर संशयीतांनी तिला हाताने धक्का देत लोटून दिले.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version