सिंधू सागर अकादमीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा……
नाशिक सिंधी शिक्षण मंडळ संचलित सिंधू सागर अकादमी व आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘७६’ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका व आर. के. कलानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सिमरन मखिजानी, शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, इतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या सौ.सिमरन मखिजानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. दरवर्षी प्रमाणेच शाळेतील विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन व कवायत झाली. त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुण्या सौ. सिमरन मखिजानी यांनी भारताला बलशाली बनविण्यासाठी व प्रगत भारत बघण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सिमरन मखिजानी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. व सर्व विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे अल्पोपहार देण्यात आला.