Home ताज्या बातम्या अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक...

अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध…

0

अमरकुमार प्रस्तुत ‘ वन्स मोअर किशोरदा ‘ या सदाबहार संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध…

दिल क्या करे, ड्रीम गर्ल, नैनो मे सपना सपनो मे सजनी, तुमसे बढकर दुनिया मे, प्यार को चाहिये क्या एक नजर, पन्ना की तमन्ना है के, ओ साथी रे, कह दू तुम्हे, तुज संग प्रीत लगाई सजना, मेरे दिल ने तडप के, हाय रे हाय तेरा घुंगटा, इंतहा हो गई, आदमी जो कहता है, मेरे नैना सावन भादो, एक मै और एक तू , ” अशी एकाहून एक सरस हिंदी चित्रपटातील हृदयस्पर्शी अजरामर गाणी गायकांनी सादर करून रसिकांची मने जिंकली, निमित्त होते ते नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत आशा मेलोडी मेकर्स वतीने आयोजित गाजलेल्या हिंदी चित्रपटातील कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित ‘ यादों की सरगम ‘ या सदाबहार हृदयस्पर्शी चित्रपट गीतांचे बुधवार दि.२२ जानेवारी २०२५ रोजी स्वार्णिमा हॉल, इंदिरानगर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना उपस्थित रसिकांनी उस्फुर्त दाद देऊन मनस्वी आनंद घेतला .कार्यक्रमाचा प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार करोशिया यांनी केले होते .

स्वतः अमरकुमार यासह संजय परमसागर, विजय राठोड , स्नेहा केदारे , नेहा आहेर, श्वेता डोके, जगन चव्हाण, अजय चव्हाण, संदीप सावंत, प्रज्ञा गोपाळे, उदय महादास यांनी विविध गाजलेली गाणी सादर केली. याप्रसंगी गायक घनश्याम पटेल, चंचल दादा चौधरी, सुनिल पाठक, प्रशांत चंद्रात्रे, राजेश दाणी, दिलीप सोनवणे, योगेश सोनवणे, सलीम शेख, अजय पाटील, योगेश महाजन , भरत भोई, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोवील यांनी केले तर ध्वनी व्यवस्था पवन रोकडे यांनी सांभाळली .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version