Home क्राईम दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात...

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

0

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्या प्रकरणी मुलासह तिघांविरोधत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघां विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सह भारतीय न्याय संहिता कायदा कलमाच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता आरोपींनी सल्ला मसलत करुन फिर्यादी पवन पवार यांचा कार्यकर्ता तसेच दलित समाजाचा असल्याने फिर्यादीला मोठी शिक्षा व्हावी तसेच दलित समाजावर अन्याय व्हावा या हेतुने  फिर्यादी यश गरुड व  पवन पवार तसेच त्यांचे इतर साथीदारांसाह मिळुन 22 नोव्हेंबर २०२४ रोजी जबरी चोरी केली आहे अशी पोलीसांना खोटी माहिती देवुन फिर्यादी
यांना आरोपी केले होते म्हणुन फिर्यादी यांनी त्यांचे विरोधात कायदेशिर फिर्याद दिल्याने गुन्ह दाखल करण्यात आला होता.

पण सदर गुन्हा खोटा असल्याने फिर्यादी यश सतिश गरुड, वय-27, रा. सफलता अपार्टमेंट, कॅनाल रोड, नाशिक रोड यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चुंबळे, प्रताप शिवाजी चुंभळे रा.नाशिक, सुनिल बबालाल शाह रा.मुंबई, रविंद्र चंपाशी जैन रा.मुंबई यांच्या विरोधात १७ जानेवारी २०२५ रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version