एम डी विक्री करणारे दोन आरोपींना अटक….. ३ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त…..
एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद करून पोलिसांनी ३ लाख ८७,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.१३ जनेवरी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना पाटील नगर मधील मनपा गार्डनचे कंम्पाउंडलगत, सार्वजनिक रस्त्यावर, त्रिमुर्ती चौक परिसर अंबड नाशिक याठिकाणी दोन जण एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने संशयित रोहित नंदकुमार पवार उर्फ बिटटया, वय- २८ रा. संगठा सफायर बी विंग, चेतना नगर, नाशिक बाबु प्यारेलाल कनोजिया वय – ३५ वर्षे, रा. हेगडेवार नगर त्रिमुर्ती चौक, नाशिक पकडुन त्यांचेकडुन अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्सच्या मदतीने ३ लाख ५८ हजार रुपयांचा ७१.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त करून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस करीत आहेत.रोहित नंदकुमार पवार उर्फ बिटटया आणि बाबु प्यारेलाल कनोजिया यांच्या विरूध्द यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशिला कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, सहायक पोलिस उप निरीक्षक रंजन बेंडाळे, सहायक पोलिस उप निरीक्षक देवकिसन गायकर, सहायक पोलिस उप निरीक्षक संजय ताजणे, भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांदे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अर्चना भड तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे गणेश कोंडे, किसन पवार, नाना बर्डे यांनी केली आहे.