नाशिकरोड करांच्या समस्या सोडवा ……
उत्तुंग झेप तर्फे नाशिक रोड विभागाला साकडे……
नाशिक रोड विभागिय कार्यालय येथे उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य रोहन देशपांडे यांच्यासह शिष्टमंडळाने नागरिकांच्या विविध समस्येच्या प्रश्नासंदर्भात विभागीय अधिकारी चंदन घुगे व संबंधित अधिकारी आणि त्या विभागाचे प्रतिनिधी यांसोबत सखोल चर्चा करून निवेदन देण्यात आले. अनेक महिन्यांपासून नाशिक महानगरपालिका नाशिक रोड विभागातून रखडलेल्या नागरी समस्यांबाबत संपूर्ण “पाढाच” वाचण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने प्रमुख रस्त्यांवरील पडलेले खड्डे, अनधिकृत फेरीवाल्यांची वाढलेली संख्या, रस्त्यावरचे थांबलेले डांबरीकरण, नाशिक रोड विभागातील सर्व स्वच्छतागृहांची दुरावस्था, प्रमुख रस्त्यांवरील पुसलेले पांढरे पट्टे व त्यावरील चमकणारे रेडियम यामुळे दळणवळणामध्ये होणारा अडथळा, फुटपाथ वर व्यवसायिकांची वाढलेली गर्दी, वाहतूक बेटांची झालेली दुरावस्था, रस्त्यावरील स्ट्रीट पार्किंगचा प्रश्न, उद्यानांमधील अस्वच्छता , बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे , दत्त मंदिर, वास्को चौक, मीना बाजार, गायकवाड मळा, छत्रपती शिवाजी चौक आणि गायकवाड मळा येथील रहदारी चा प्रश्न अशा विविध संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा संपन्न झाली.
नाशिककडून विभागीय अधिकारी चंदन घुगे याचबरोबर आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, विविध कर विभाग, पाणीपुरवठा विभाग, वीज पुरवठा विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या वतीने रोहन देशपांडे यांच्या शिष्टमंडळ समवेत हेमंत गाडे, जमदाडे, अमृत शिरसाठ, अखिल कादरी, आकाश शिलावत, अथर्व पाठक, विनीत सातपुते, हेमंत जाधव, सौ.प्रियंका पटेल सौ.सविता सोनवणे, सौ.हंसा भगत आधी नागरिक उपस्थित होते.
सदर कामं विषयक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरात लवकर कामे मार्गे लागतील विभाग अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.