जिल्ह्यातील ठेकेदारांचे शासनाकडे २५० कोटी रुपये बिले प्रलंबित……
राज्यातील ठेकेदारांचे दहा ते बारा हजार कोटी देयके शासनाकडे प्रलंबित आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५० कोटी रुपये ठेकेदारांचे बिले बाकी आहेत. थकीत बिले त्वरित मिळावीत याकरिता येथील बांधकाम भवना समोर जिल्हा परिषद नाशिक येथे इंडियन बिल्डर असोसिएशन व हॉट मिक्स कॉन्ट्रॅक्टर्स या सर्वांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलेले आहे.
या परिस्थितीत मार्च २०२३ पर्यंत पंचवीस हजार कोटी रुपयाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत नंतरच्या बजेटमध्ये दहा ते बारा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे या सर्व गोष्टींसाठी किमान सहा-सात वर्षे तरी लागतील असा अंदाज दिसत आहे. ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार एवढी सर्व देयके शासनाकडे बाकी असताना सुद्धा पावसाळी अधिवेशनात अनेक कामे मंजूर करण्याचा घाट बांधलेला आहे यामुळे या गोष्टींना ठेकेदारांचा विरोध आहे. मागची देयके पूर्ण होईपर्यंत नवीन कामे घेण्यात येऊ नये व मंजूर करू नये अशी मागणी ठेकेदारांनी केलेली आहे. यामुळे मात्र ठेकेदारांना बँकेचे हप्ते, सिमेंट, स्टील , खडी व मजुरीचे मजुरांचे पैसे सुद्धा देता येत नाही.
अभय चौकशी , समाधान आहेरराव, महेंद्र पाटील, विजय बाविस्कर, योगेश पाटील, रमेश शिरसाट, जीजी काटेकर ,राजू कुराडे, संजय आव्हाड, सुधीर देवरे, प्रकाश बनकर, विलास निफाडे, विजय घुगे, राजू काकड, राहुल सूर्यवंशी आदींसह बहुसंख्य ठेकेदार आंदोलनात हजर होते
दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा नाशिक