परभणी घटने प्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महसूल आयुक्तांना निवेदन….
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने परभणी प्रकरणी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम साहेब यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि संविधानाची प्रतिमा उखडनार्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, व भविष्यात अश्या घटना घडू नये साठी सरकारने प्रयत्न करावेत, याकरिता नाशिकरोड महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना सर्व भीमसैनिकांनीकांच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधित गुन्हेगारांना देशद्रोह आणि कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. वारंवार अशा घटना घडल्यास तीव्र सवरुपाचे आंदोलने महारष्ट्रभर करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड.शशीकांत उन्हवणे, रवी पगारे, सुमित बागुल, जावेद शेख, आबिद शेख बिलाल, शेख सलमान शेख, गोविंद शिंगारे, नवनाथ कातकडे, नवनाथ माने, शरद सोनवणे आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.