मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी उत्सव समिती ना.रोड मुक्तीधाम ट्रस्ट वतीने निवेदन…..
मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी संविधान शिल्पाची विटंबना निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी उत्सव समिती ना.रोड मुक्तीधाम ट्रस्ट आणि सर्व आर पी आय गटाच्या वतीने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना निवेदन देण्यात आले.
काल मुर्तीजापुर परभणी या ठिकाणी माथेफिरू समाजकंटक देशद्रोही सोपान दत्ताराव पवार परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधाना शिल्पाची हेतू पुरस्कार तोडफोड करून विटंबना केली असून सदरच्या त्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना झालेला असून सर्वच स्तरातून सदर घटनेचा होत आहे ज्या समाजकंटकाने ये कृत्य कोणाच्या सांगण्याने केले आहे सदर केलेल्या कृत्याचा मास्टरमाईंड शोधून त्याच्यावर आणि समाजकंटक सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदर घटनेमध्ये आरोपी चौकशीमध्ये समोर येतील त्याच्यावर कारवाई व्हावी असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी सकल हिंदू समाज, सर्व आर पी आय गटाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.