सुवर्णा शिरसाट हिचे एम पी एस सी परीक्षेत यश……
दहिवड येथील सुकन्या सुवर्णा शिरसाट या मुलीने एम पी एस सी परीक्षेत बाजी मारत दोन्ही गावांचे नाव रोशन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत वाखारी येथील सुकन्या सुवर्णा ही दहिवड येथील दादाजी कारभारी बच्छाव सर यांची सून असून सौ सुवर्णा सुयोग बच्छाव तिने ग्रामीण भागात राहून हे असे सिद्ध करून दाखवले की मनापासून तयारी केली की कुणीही उच्च पद मिळवू शकतो कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो परंतु सुवर्णा ने विक्रम मोडीत काढला असून ह्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आणि मंत्रालयापर्यंत मजल मारण्याची बाजी मारली. सुवर्णा चे वडील हे गरीब कुटुंबातील शेतकरी आहेत.
सुवर्णा ने मिळविलेल्या यशाबद्दल दहिवड येथील ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तथा प्रथम नागरिक आणि सर्व सुशिक्षित तरुण उपस्थित होते सर्व गावकऱ्यांनी तिचे कौतुक करत पाठीवर शाबासकीचे थाप दिली याप्रसंगी गणू भाऊ देवरे व संजय देवरे उपस्थित होते. याप्रसंगी सुवर्णा हिने सर्व ग्रामस्थांना मी याच पदावर थांबणार नसून पुढील अजून उच्च पद मिळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून दहिवड गावाचे नाव रोशन करीन अशी ग्वाही दिली
प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देवळा