Home ताज्या बातम्या देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…

देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर…

0

देवळालीत महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरेच……..संभ्रम दूर……

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार सरोज अहिरे असल्याचे शेवटी जाहीर झाले असून तसे आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविले आहे.  शनिवारी गिरणारे येथे झालेल्या सभेत पवार यांनी हे आवाहन केले.


देवळाली मतदारसंघात गैरसमजातून देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन केला होता. मात्र संबंधित उमेदवाराचा फोन बंद असल्याने त्याची माघार होऊ शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट पत्रच दिले असून देवळालीत सरोज अहिरे याच महायुतीच्या उमेदवार असून, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील संभ्रम दूर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून, तो दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्र पाठवल्याचे सांगत त्या पत्राचे वाचनच अजित पवार यांनी सभेत केले होते. यावेळी आमदार सरोज अहिरे यांच्यासह अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version