नाशिकरोडला बेकायदा विदेशी दारू जप्त……नाशिकरोड पोलीसांची कारवाई…… ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……
उपनगर पाठोपाठ अवैधरित्या बेकायदा विदेशी दारू बाळगुन विक्री करणा-यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई करीत देशी विदेशी दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मद्य वाटप होणार असल्याच्या ए.टी.सी. पथकाचे विष्णु गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित पळसे येथे विनापरवाना बेकयदा विदेशी दारूची विक्री करीत आहे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे भुनेश्वर पथकाने विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्या इसमाला अटक करून त्याच्याकळून दारूच्या विविध कंपन्यांची ६३ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे.
नशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हयाचा पुढील तपास विजय टेमगर हे करत आहे.सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कार्मिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलिस निरीक्षक बडेसाहब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, पोलिस निरीक्षक अरुण सांवत, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सुर्यवंशी, गुन्हे शोध पथक व ए.टी. सी. पथकाचे संदीप पवार, विजय टेमगर, विष्णु गोसावी, अविनाश देवरे, हेमंत मेढे, सागर आडणे, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे, नाना पानसरे, समाधान वाझे, विशाल कुवर, राहुल मेहदले, अजय देशमुख, संतोष पिंगळ आदींनी केली आहे.