गंधर्व नगरीत मोकाट कुत्र्यांचा त्रास…..
जेलरोड परिसरात अनेकांना घेतला चावा……
गंधर्व नागरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असून महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गंधर्व नगरी परिसरात एका नेपाळी कुटुंबातील ओम भिमसिंग ओली या १२ वर्षीय मुलाला मोकाट कुत्रा चालल्याने जखमी झाला. यामुळे परिसरांत नागरिकांमध्ये भितीने वातावरण निर्माण झाले असून आत्तापर्यंत नाशिकरोड – जेलरोड भागात अनेक जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे.
वारंवार मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत असून नाशिक महानगरपालिकेचे तत्सम अधिकारी सदर घटना नियंत्रणात आणण्यात वेळोवेळी अपयशी ठरल्याने नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप मनसेचे रोहन देशपांडे यांनी केले आहे.
दुसरीकडे शासकीय दवाखाने कार्यक्षम नसल्याने त्यांच्यावर योग्य उपचार कसे होतील यांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. रोहन देशपांडे यांनी नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर साहेब यांना सदर घटनेची माहिती तत्काळ पोहोचवली व त्या मुलांवर योग्य ते उपचार करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण्याची विनंती केली. महापालिका प्रशासनाचे अपयशाने नागरिकांना प्रचंड मानसिक , आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी लहान मुलींकडे विषेश लक्ष देण्याचे अवाहन मनसेचे रोहन देशपांडे यांनी केले आहे.