Home ताज्या बातम्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…

विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…

0

विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शिवम पडुसकर यास दुहेरी सुवर्णपदक…

मीनाताई ठाकरे स्टेडियम , हिरावाडी, पंचवटी येथे मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत धुळे,जळगाव,नंदुरबार,नासिक येथील खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान बिटको कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला शिवम पडुसकर याने लांब उडी व तिहेरी उडी या दोन्ही क्रीडा प्रकारात उत्कृष्ट अशी उडी घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

त्याची पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राज्यस्तर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्यास क्रीडाशिक्षक श्री. महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या सुयाशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version