सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती तर्फे रविवारी नाशिकरोड रत्न पुरस्कार…..
सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व सेवा समिती, नाशिकरोड यांच्यातर्फे नाशिकरोड रत्न, शिक्षकगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळा रविवार २० रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नाशिकरोड येथील महेश्वरी भवन याठिकाणी पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पोटविकारतज्ञ डॉ. शरद देशमुख यांच्या पोट आणि यकृत आजारांविषयी व्याख्यानाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
त्यानंतर विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा तसेच सामाजिक संस्थांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व व्यापारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी दिली.
नाशिकरोड रत्न पुरस्कार ओमप्रकाश कुलकर्णी (विज्ञान), मोगल जाधव (साहित्य), रमेश कळमकर (सेवाभावी क्षेत्र), एस.आर. सुकेणकर (पत्रकारिता), योगेश शिंदे (सामाजिक कार्य), सचिन चांगटे (शिक्षण), न्या. वसंत शिवराम पाटील (न्याय व कायदा), अमित कुलकर्णी (कला अभिनय), संस्था रत्नः जैन सोहाळ ग्रुप, डॉ. विभा कोमावार, (वैद्यकीय), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र संपकाळे(प्रशासकीय) यांना गौरवण्यात येणार आहेत. तसेच विशेष पुरस्कार देऊन सुनीता आडके, रोहिणी खैरनार, मोनालिसा पटनाईक, भाग्यश्री शहरकर या शिक्षकाना गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री नंदिनी वैद्य, आदिवासी आयुक्त नयना गुंडे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. सुशील पारख आणि डॉ. सुषमा भुतडा यांनी केले आहे. पुरस्कार सोहळ्याद्वारे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.