धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात..
मनमाड | लहान असताना शाळेच्या विद्यार्थी दशेतील जीवन प्रवास पूर्ण करून हेच विद्यार्थी नंतर त्यांच्या युवा वयात वैयक्तिक नोकरी, व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्यात कायमचे व्यस्त होऊन जातात. जबाबदाऱ्या आणि वेळ यांचे जणू बंधनच त्यांना कायमचे होऊन जाते. यातून रोजच्या तसेच शाळा-कॉलेजच्या जुन्या मित्र-मैत्रिणींना आठवणे-भेटणे फार दुर्मिळच..
परंतु छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड च्या दहावी वर्ष 2002-03 च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर च्या निमित्ताने तब्बल 21 वर्षांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा करत. सामाजिक बांधिलकी जपत, आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेने मिळून पैसे जमवून सतत सामाजिक कामात ते पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या गेट-टुगेदर च्या वेळी या माजी विद्यार्थ्यांनी मनमाड येथील रिमांडहोम ला भेट देऊन खेळाचे साहित्य व मुलांना कपड्याचे व खाऊचे वाटप केले होते. त्यानंतर काही दिवसांनी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेला दोन लोखंडी कपाटे भेट म्हणून दिले होते. आणि आता पुन्हा 13 ऑक्टोबर 2024 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुक्ती दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत मनमाड शहरातील नामांकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाला(बोर्डिंग) भेट देऊन या वस्तीगृहाला आवश्यक साहित्य म्हणून 15 खुर्च्या आणि पोर्टेबल वायरलेस (माईक, ब्लूटूथ) स्पीकर साऊंड सिस्टिम सप्रेमभेट म्हणून दिले आहे. तसेच पाण्याचे वॉटर फिल्टर दुरुस्त व पूर्ववत करून दिले.
यावेळी वस्तीगृहाच्या व्यवस्थापकांनी या छत्रे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थ्यांच्या कमिटीचे आभार मानले, तसेच यांनी केलेल्या मदतीचे व कामाचे कौतुक देखील केले. विद्यार्थ्यांनी देखील यापुढे मदतीचा एक हात देत राहु आणि वस्तीगृहाला भविष्यात देखील भेट देऊन मद्दत करू असे आश्वासन दिले.
यावेळी वस्तीगृहाचे अधीक्षक राहुल घोडेराव, समाजसेवक महेंद्र गरुड, विशाल घोडराव तसेच विद्यार्थी कमिटीच्या वतीने अनिरुद्ध पगारे, मनीषा बिडगर, शैलेश सोनवणे, विक्की वाघ, खलील शेख, अमोल परदेशी उपस्थित होते. पुढच्या वेळी अधिक संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित राहतील असे देखील कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.