Home ताज्या बातम्या बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न ....

बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . .

0

बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्री जयंती उत्साहात संपन्न . .

नाशिकरोड भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचे महत्त्वपूर्ण योगदान असून अनेक आंदोलने केली. त्यांनी दिलेली शिकवण सत्य, अहिंसा, अस्तेय ,स्वावलंबन, सदाचार व विचार रोजच्या जीवनात आचरणात आणा ,तर लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा मूलमंत्र दिला .लालबहादूर शास्त्रींवर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा पगडा होता त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती .

कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे असे ते नेहमी म्हणत, “असे विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करतांना गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यलयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली . तसेच याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गांधीजींचे व लालबहादूर शास्री यांचे अनमोल विचार व कार्य प्रकट केले . तसेच एनसीसीवतीने बेस्ट फ्रॉम वेस्ट कलाकृती विद्यार्थ्यांनी या निमित्ताने सादर केली. यावेळी रोहित पाटील यांनी मार्गदर्शन केले. या जयंतीप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर यासह प्रा.विजय सुकटे, डॉ के. एम. लोखंडे, डॉ कृष्णा शहाणे, डॉ. शशिकांत साबळे, डॉ. साहेबराव निकम डॉ. सुदेश घोडेराव,, डॉ.उत्तम करमाळकर, डॉ. विद्युल्लता हांडे, प्रा. लक्ष्मण शेंडगे ,प्रा.दीपक टोपे, प्रा. आर. बी. बागुल, डॉ शरद नागरे तसेच प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते . महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version