Home क्राईम कार चोरी टोळीतील मुख्य आरोपी गजाआड…… स्विफ्ट कार जप्त…..

कार चोरी टोळीतील मुख्य आरोपी गजाआड…… स्विफ्ट कार जप्त…..

0

 

कार चोरी टोळीतील मुख्य आरोपी गजाआड…… स्विफ्ट कार जप्त…..

आंतरराज्यीय कार चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी गजाआड केले असून एक ०५ लाख रूपये किंमतीची स्वीफ्ट कार जप्त करून
मोटार सायकल चोरी शोध पथक व उपनगर पोलीस ठाण्याने संयुक्त कामगिरी केली. नाशिक शहरातुन कार चोरी करून त्या तामिळनाडु व कर्नाटक राज्यात विक्री करणारी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्यासाठी बुलढाणा व इतर जिल्हयात पाठवुन आरोपीची माहीती प्राप्त करून कारवाई करण्याचे काम सुरू होते.

आरोपींचा घेत असतांना शेख नदिम शेख दाऊद हा आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपी असुन तो त्याचे साथीदारांच्या मदतीने वेगवेगळया जिहयातुन कार चोरी करून त्या तामिळनाडु व इतर राज्यात विक्री करत असल्याची माहीती मिळाली होती. संशयित आरोपी शेख नदिम शेख दाऊद, वय ३२ वर्षे, मु.पो. धाड, जि. बुलढाणा यास शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामिण यांच्या मदतीने अटक करण्यात आली अधिक तपास केला असता त्याने त्याचे साथीदार किशोर पवार व विशाल जाधव यांच्या मदतीने नाशिक शहरातुन कार चोरी करून तामिळनाडु राज्यातील पाहीजे डेवीड यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले. संशयिताकडून शहरातील उपनगर आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस  आयुक्त  संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,  पोलिस उप निरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलिस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर,  मंगेश जगझाप, रविंद्र दिघे, भगवान जाधव, संदिप हिवाळे, स्वप्नील सपकाळे नेमणुक उपनगर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version