पोलीस आयुक्तालय गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई……
नुकताच पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील
खुनाच्या गुन्हयात आरोपी कुंदन परदेशी यास जन्मठेप व त्याचे साथीदार यांना ०७ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी सुनावलेली आहे. या गुन्हयात अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिने सरकारतर्फे योग्य रितीने साक्षी पुरावे न्यायालयासमोर मांडले व अथक प्रयत्न केल्यामुळेच आरोपिंना शिक्षा लागली.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यात 16 आणि 17 जुलै रोजी नाकाबंदी व कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. कॉबींग ऑपरेशन दरम्यान हॉटेल, लॉजेस, धाबे, गुन्हेगार चेक करणे, फरारी व पाहिजे असलेले आरोपी चेक करून कारवाई , समन्स, वॉरंट बजाविणे, हद्दपार आरोपींना चेक करुन कारवाई करण्यात आल्या.
यापुढे देखील कोंबींग ऑपरेशन व धडक कारवाई सतत राबविण्यात येणार असुन सराईत गुन्हेगार यांनी कोणत्याही प्रकारे शहरातील शांतता भंग करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ०४ पोलीस उप आयुक्त, ०७ सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांचेसह पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच गुन्हेशाखा युनिट १ व २ व विशेष पथकातील प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखा युनिट मधील अधिकारी व पोलीस अंमलदार आदींनी कोबींग ऑपरेशन मध्ये सहभागी होऊन कारवाई केली.