गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आरोपींना सार्वजनिक ठिकाणी मनाई……
नाशिक शहरात होणा-या गणेशोत्सव हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी आदेश पोलिसांनी सूचना केलेल्या आहेत तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दितील आरोपींना ०७ सप्टेंबर ते दि. १८ जानेवारी पर्यंत सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहण्यास मनाई केले आहे.
सदर आदेशान्वये उपनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक ०८ सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, शेख गौरव गवळी व अनिल शिंदे आदींनी कर्तव्यावर असतांना उपनगर पोलीस ठाणे हद्दित गस्त करत असतांना देवळाली गाव नाशिकरोड याठिकाणी सार्वजनिक ठिकाणी उपरोक्त आदेशाप्रमाणे अनिकेत रत्नाकर देवरे वय १९ वर्षे, रा. महादेव मंदिराजवळ, देवळाली गाव, नाशिक रोड, नाशिक व पियुश बाळु शिंदे वय २४ वर्षे, रा. सुंदरनगर झोपडपट्टी, देवळाली गाव नाशिक रोड नाशिक असे वरील आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यास आणण्यात आले. त्यांच्याविरूध्द उपनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.