गोपीचंद पगारे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान…….
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत, ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या तर्फे दिला जाणारा, डाॕ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (*ग्रंथमित्र*) पुरस्कार मुंबई येथे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांत (दादा) पाटील यांचे हस्ते, नाशिकचे गोपीचंद पगारे यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.विकासचंद्र रस्तोगी,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.डाॕ.गजानन कोटेकर, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, ग्रंथालय संचालक मा.अशोक गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. रू २५ हजाराचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भारतीय संविधान ग्रंथाची प्रत,असे पुरस्काराचे स्वरूप होते.
भविष्यात ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी जोमाने कार्य करण्याची भावना, ग्रंथमित्र गोपीचंद पगारे यांनी व्यक्त केली.मातृभूमी प्रबोधन समिती संचलित म.फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असुन ,ग्रंथालयाच्या ३२ वर्षाच्या सोनेरी वाटचालीत त्याचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वास मिळालेला
बहुमान वाचनालयाच्या व संस्थेच्या दृष्टिने अभिमानास्पद असल्याने नंदकिशोर साळवे,संतोष जोपुळकर, राजेद्रं जाधव, सुधीर भालेराव ,कुणाल शेजवळ,राजेद्रं चंद्रमोरे, विजय होर्शिल, संदीप पांडव, सरला पगारे , मिना निकम, यशवी पगारे, हर्षाली झनकर,, भास्कर नरवटे, संदिप झनकर, मनोहर हरदास,सुभाष राऊत,विलास रोकडे, योगेश पगारे,गणेश चंद्रमोरे ,सन्नी निंकम,श्रीशांत झनकर,मच्छिद्रं निरभवणे, मनोज मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.