Home ताज्या बातम्या गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान…..

गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान…..

0

गोपीचंद पगारे यांना ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर…. मुंबई येथे होणार सन्मान…..

शासनाचा डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद पगारे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ५ ऑगस्ट रोजी चा शासन निर्णय अन्वये डाॕ.एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ( ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार गोपीचंद जगन्नाथ पगारे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. सदरील पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रक्कम रुपये २५०००/- आणि ग्रंथभेट देवून  लवकरच शासनाच्या वतीने मुंबई येथे सन्मान करण्यात येणार आहे.

सोनेरी वाटचाली तमहात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या  सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारानंतर पुन्हा एकदा गोपीचंद पगारे यांना मोठा सन्मान प्राप्त झालेला आहे.
सदरील ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोपीचंद पगारे यांचे विभागाचे संचालक अशोक गाडेकर, विभागीय ग्रंथालय अधिकारी सचिन जोपूळे,  येवलेसाहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगताप यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे. ग्रंथमित्र पुरस्कार ख-या अर्थाने योग्य व पात्र असलेला ग्रंथालय व वाचक चळवळीत तन, मन, व धनाने समर्पित कार्यकर्त्यांला मिळाल्याबद्दलमातृभूमी प्रबोधन समिती व महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या सर्व पदाधिकारी, विश्वस्त व सभासदांनी गोपीचंद पगारे यांचे अभिनंदन करून गोपीचंद पगारे यांना पुढील वाटचालीस व सामाजिक कार्याच्या प्रवासास शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version