Home ताज्या बातम्या नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयात 15 दिवसांकरिता मनाई आदेश……

नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयात 15 दिवसांकरिता मनाई आदेश……

0

नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयात 15 दिवसांकरिता मनाई आदेश……

नाशिक शहरात जनतेच्या विविध मागण्यासाठी, राजकिय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना हया मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषणे सारखे आंदोलने तसेच धार्मिक संणांचे आयोजन करतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषयक घडामोडींच्या तसेच देशात इतरत्र घडलेल्या घटनांचे पार्श्वभूमीवर त्याच्या प्रतिक्रिया नाशिक शहरात उमटत असतात लवकर उमटतात. तसेच सध्या महाराष्ट्र राज्यात विविध पक्षामध्ये फुट पडुन विरोधक व सत्ताधारी एकमेकांविषयी सातत्याने आरोप प्रत्यारोप करत असल्याने त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटुन विविध आंदालने व निदर्शने चालु आहेत

त्यामुळे जनमानसात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा सदस्यांच्या पात्रतेसंबंधाने प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याचे निकाला नंतर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने तसेच इतर घटनांचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोणातून महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत म्हणून पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर कार्यक्षेत्रात १४ जुलै ते २८ जुलै पर्यंत १५ दिवसाकरिता मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version