किशोर कारडा यांचा झुलेलाल पतसंस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा…….. ?
नाशिकरोड येथील झुलेलाल पतसंस्थेचे मोठ्या मतांनी निवडून आलेले संचालक किशोर कारडा यांनी आपला राजीनामा जिल्हा उनिबंधक कार्यालयात दिला आहे. झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन २०२४ ते २०२९ करीता निवडणूक १३ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. निवडणुकीत परिवर्तन पॅनल च्या उमेदवारांना पतसंस्थाच्या सभासदांनी प्रचंड बहुमताने निवडून एकतर्फे विजय मिळवून दिले होते. परिवर्तन पॅनल च्या निवडून आलेल्या संचालकांनी एकमताने अध्यक्ष पदावर रतन चावला तर उपाध्यक्षपदी हरीश देवानी यांची निवड केली होती. नवीन आलेल्या संचालक मंडळाने सर्वप्रथम पतसंस्थेचे नूतनीकरण करून गुढी पाडवा च्या शुभ मुहूर्तावर विधिवत उद्धघाटन समारंभ सत्यनारायण पूजा करून नव्या पर्वास सुरुवात केली.
सभासद आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून नवे शेअर्स धारक करने, नवी मुदत ठेवी पतसंस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करने, तसेच अल्पबचत सुरू करून छोट्या व्यवसायिकांना कर्ज देणे आदी योजना आखण्यात आले होते. पतसंस्था आता सुरळीत होऊन पुन्हा पूर्वी प्रमाणे पूनर्वैभव प्राप्त करेल याची अपेक्षा असताना संचालक किशोर कारडा यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. संचालक पदाचा राजीनामा किशोर कारडा यांनी पतसंस्थेत २३ मार्च रोजी दिले असल्याचे समजते पण त्यावेळेस राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याची माहिती आहे. माझ्या वयक्तिक कारणामुळे संचालक मंडळांच्या बैठकीला हजर होऊ शकणार नाही आणि पतसंस्था च्या इतर कामांना वेळ नसल्यानेच किशोर कारडा यांनी राजीनामा दिल्याचे कळते. मार्च मध्ये चौकशी केल्यावर कुणाचाही राजीनामा स्वीकार केला नसल्याचे संचालकांनी सांगितले.
आता पुन्हा संचालक किशोर कारडा यांनी २३ मार्च च्या पत्राचे संदर्भ देत २१ जुन रोजी जिल्हा उप निबंधकांना २३ फेब्रुवारी रोजी राजीनामा पत्र पतसंस्थेत दिल्याचे पत्रात उल्लेख असून संचालक मंडळाने राजीनामा स्वीकारला आहे की नाही याबाबत माहिती नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच माझ्या वैयिक्तक कारणांमुळे पतसंस्थाच्या संचालक पदाचा राजीनामा देत असून संस्थेच्या पुढील कामकाजास मी जबाबदार राहणार नसल्याबाबत चे अर्ज किशोर कारडा यांनी जिल्हा उपनिबंध यांना दिले आहे. किशोर कारडा यांचा राजीनामा मंजूर होतो का ? नाही हे लवकरच कळणार आहे…..
किशोर कारडा यांचा राजीनामा मंजूर झाल्यास त्यांच्या रिक्त झालेल्या संचालक पदासाठी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. दरम्यान राजीनामा मंजूर झाल्यास एका पदासाठी पुन्हा निवडणूक न घेता एक संचालक निवडावा अशी चर्चा सभासदांमध्ये आहे.