Home क्राईम अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय...

अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी

0

अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक….. क्राईम युनिट २ ची उल्लेखनीय कामगिरी……

Oplus_0

नाशिकरोड व्यापारी बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या संशयित आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोन ने २४तासात अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बुधवारी रात्री ११/४५ वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील कन्या कोठारी शाळेजवळ नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले कलेक्शन गोळा करून घरी जात असताना चौघा जणांनी अडवून सशस्त्र हल्ला करून लोहरकर यांच्याकडील सुमारे एक लाख पाच हजार रुपयाची रोकड लंपास करून पळून गेले. या घटनेने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली होती.

Oplus_0

क्राइम ब्रांच युनिट दोन ने उल्लेखनीय कामगिरी करीत चौघा आरोपींना तातडीने अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. क्राईम ब्रँच युनिट दोन चे हवालदार प्रकाश भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी आहेत हे सिन्नर फाटा परिसरातील एका हॉटेल जवळ असल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेल जवळ संशयित आरोपिंना ताब्यात घेतले.

विश्वास नितीन श्रीसुंदर वय २५ राहणार जलशुद्धीकरण केंद्र नवीन कोर्ट नाशिकरोड, हारून निसार कुरेशी वय २६ राहणार लक्ष्मी अपार्टमेंट समोर दशक जेलरोड नाशिकरोड, भारत देविदास चौधरी राहणार एकलारा रोड मोगल मंजिल जवळ मगर मळा नाशिकरोड व नासिर कमरोद्दिन शेख वय २२ राहणार गुलशन नगर डेपोजवळ मालेगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कछि राहणार जलशुद्धीकरण केंद्र नाशिकरोड असे असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या संदर्भात त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल व लुटून नेलेली रक्कम असा सुमारे एक लाख ८२ हजार रुपये चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Oplus_0

सदरची कामगिरी क्राईम ब्रँच युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, प्रकाश भालेराव, शंकर काळे, सुनील आहेर, सोमनाथ जाधव प्रकाश महाजन, प्रकाश बोडके, प्रवीण वानखेडे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version