Home ताज्या बातम्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय….. शंकर ललवाणी यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड...

लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय….. शंकर ललवाणी यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव….. सिंधी समाजासाठी गर्वाची बाब

0

लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय….. शंकर ललवाणी यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव….. सिंधी समाजासाठी गर्वाची बाब…..

 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंदूर लोकसभा मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून आलेले भारतीय जनता पार्टी इंदूर चे खासदार शंकर ललवाणी यांचे नाव
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समवेशित झाले असुन त्यांना जागतिक विक्रम प्रदान करण्यासाठी आमंत्रण पाठविण्यात आले आहे.  वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन ने पत्र पाठवून निमंत्रण पत्रिका इंदूर चे खासदार शंकर लालवानी यांना पाठविली आहे. 18 जुलै 2024 रोजी ब्रिटीश पार्लमेंट, लंडन येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स पुरस्कार सोहळ्यात पुरस्कारार्थी होण्याचे आमंत्रण आणि भारताच्या लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये 11,75,092 मतांच्या विक्रमी फरकाने निवडून आल्याबद्दल जागतिक विक्रम स्विकरण्या साठी आमंत्रण पाठविण्यात आले आहे.


वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ही  एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. लोकांना विविध रेकॉर्ड बनवण्यासाठी आणि इतरांना ते मोडण्यास प्रोत्साहन देणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे. ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि मानवतेसाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरले आहे अशा लोकांचा आणि संस्थांचा सन्मान केला जातो.

ही संस्था रेकॉर्ड बनविण्यास प्रोत्साहन देते आणि ती प्रत्येकाला आणि कोणालाही, जगाच्या कोणत्याही भागात, त्यांची स्वप्ने, यश हे विक्रमी वास्तव साकार करण्यासाठी आमंत्रित करते. जागतिक वारसा स्थळे देखील “लंडन प्रेस” ब्रिटीश मासिकात सूचीबद्ध, प्रमाणित आणि प्रकाशित आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे व्यवस्थापनाने खासदार शंकर ललवाणी यांना सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये 11,75,092 मतांच्या विक्रमी फरकाने निवडून आल्याबद्दल त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कोरले गेले आहे.

सदर पुरस्कार सोहळा 18 जुलै 2024 रोजी चर्चिल रूम, हाउस ऑफ कॉमन्स (ब्रिटिश संसद) पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, (क्रॉमवेल ग्रीन एंट्रन्स) लंडन येथे संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून आयोजित केला जाणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुण्यांसह जगभरातील इतर विचारवंत उपस्थित राहणार आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स चे  प्रमुख विल्हेल्म जेझलर यांनी तसे अधिकृत आमंत्रनाचे पत्र खासदार शंकर ललवाणी यांना पाठविले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version