नाशिकरोडला रेल्वेखाली दोघांची आत्महत्या?….. सेल्फी करताना दुर्दैवी मृत्यू?…..
नाशिकरोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदीच्या रेल्वपुलावर दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे . मध्य रेल्वेच्या वालदेवी नदी पुलावर सेल्फी करणे दोन महाविद्यालयीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भाटिया कॉलेज मध्ये शिकणारे संकेत कैलास राठोड आणि सचिन दिलीप करवर दोघेही रा. म्हसोबा नगर, गीते मळा, चेहेडी शिव असे या घटनेत जीव गमावलेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. संकेत आणि सचिन दोघे युवक जिवलग मित्र होते दोघांच्या अचानक मृत्यूने नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन्ही मित्रांनी एकमेकांसोबत फोटो काढून आपल्या मोबाईलच्या व्हाट्सअप स्टेटस वर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून फोटो ठेवला होता. काही मित्रांनी हा स्टेटस बघितला आणि त्यावेळेसच परिसरात अचानक खबर आल्याने त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली.
दोघे मित्र फोटो काढण्यासाठी रेल्वेच्या वालदेवी नदी पुलावर दोघे मित्र सेल्फी काढणे, रिल बनविण्याच्या प्रयत्नात असताना दोघेही गाडीखाली सापडल्याने दोघेही गतप्राण झाले. रेल्वेखाली आल्याने दोन्ही मित्रांच्या शरीराच्या चिंधड्या उडालेल्या बघून प्रत्यक्ष बघणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. शनिवारी सायंकाळी चार वाजता संकेत कामावरून घरी आल्यावर आईला सांगून मित्र सचिन याच्यासोबत क्रिकेट खेळायला गेला. क्रिकेट खेळून आल्यावर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दोघेही रेल्वे मालधक्क्याच्या दिशेने गेले. इथे हे दोघेही मित्र रेल्वे मालधक्का परिसरातील रेल्वे क्रॉसिंग जवळ असलेल्या वालदेवी नदीवरील पुलावर गेले. याच ठिकाणी संकेत आणि सचिन हे दोघंही धावत्या रेल्वेखाली सापडून जागीच गतप्राण झाले.
दोघांच्याही कुटुंबाची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशी आहे. संकेत राठोड हा शिक्षण घेता घेता दुकानात कामही करीत होता. काम मिळाले म्हणून त्याने नवी दुचाकी देखील खरेदी केली होती. दोघांनाही फोटो, सेल्फीचे वेड होते. शनिवारी देखील हे दोघे मित्र फोटो काढण्यासाठी जातो असे घरच्यांना सांगून वालदेवी रेल्वे पुलाकडे गेले. या ठिकाणी ते सेल्फी काढणे, रिल्स बनविण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचे रेल्वे गाडीकडे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता आहे. त्यातच दोघेही गाडीखाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संकेत आणि सचिन या दोघा मित्रांनी आत्महत्या केल्याचा अंदाज होता. दोघांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचे गूढ मात्र उकलू शकले नाही.
मुले रेल्वेखाली आल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच दोन्ही परीवरांना शोक अनावर झाला. संकेतच्या पश्र्वात आई वडील, भाऊ चेतन आणि बहीण निकिता, चुलते, असा परिवार आहे. तर सचिनच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. दोघांचेही वडील मजुरी करणारे आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही युवकांनी आत्महत्या का केली? किंवा सेल्फी घेतांना रेल्वेखाली आले का? याबाबत अधिक तपास रेल्वे पोलिस करीत आहेत.