Home ताज्या बातम्या निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे मांडसांगवी ग्रामपंचायत येथे सर्वरोग निदान शिबिर….. नागरिकांनी लाभ...

निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे मांडसांगवी ग्रामपंचायत येथे सर्वरोग निदान शिबिर….. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे मांडसांगवी ग्रामपंचायत येथे सर्वरोग निदान शिबिर….. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन…..

ग्रामपंचायत समिती कार्यालय माडसांगवी आणि निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक याच्या सयुक्त विद्यमाने रविवार 9 जून रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीरात डॉ. किरण इंगळे (एम.एस. सर्जन), डॉ. सागर तांबोळी (एम.डी.मेडी.), डॉ. सुजित निकम (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. प्रशांत बिर्ला (नेत्ररोग तज्ञ), डॉ. हिना तांबोळी (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. युनूस तांबोळी (अस्थमारोग तज्ञ), डॉ. शुभांगी मोरे (नेत्ररोग तज्ञ), डॉ. रिमा (पटेल) बर्वे (होमीओपॅथी तज्ञ), डॉ. सना तांबोळी (बालरोग तज्ञ), डॉ. साजिया तांबोळी (दंतरोग तज्ञ) हे तज्ञ डॉक्टर्स तापसून मार्गदर्शन करणार आहेत. आयोजित शिबिराचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत समिती कार्यालय माडसांगवी. ता. जि. नाशिक आणि निर्मला लोककल्याण प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.


सौ. कल्पना अरूण खरात (सरपंच), संदिप पंडित गोडसे (उपसरपंच), शिवाजी शंकर सुंबे (ग्रामविकास अधिकारी), ज्ञानेश्वर वि. देवरे (निर्मला लोककल्याण प्रबोधिनी, अध्यक्ष), डॉ.रिमा (पटेल) बर्वे (निर्मला लोककल्याण प्रबोधिनी, उपाध्यक्ष), डॉ.ए.एस.तांबोळी (निर्मला लोककल्याण प्रबोधिनी, सरचिटणीस) सर्व ग्रामपंचायत सदस्य,
ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version