Home क्राईम चोरीच्या २ मोटार सायकल १ लॅपटॉप सह आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा २...

चोरीच्या २ मोटार सायकल १ लॅपटॉप सह आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा २ ची कामगिरी……

0
Oplus_131072

चोरीच्या २ मोटार सायकल १ लॅपटॉप सह आरोपी ताब्यात….. गुन्हे शाखा २ ची कामगिरी……

गुन्हे शाखा २ ने आरोपीला ताब्यात घेत चोरीच्या ०२ मोटार सायकल तसेच ०१ लॅपटॉप जप्त केले आहे. २६ मे रोजी गुन्हेशाखा युनिट कं.२ चे विलास गांगुर्डे यांना चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरता उपनगरनाका येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळू शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ जाधव, प्रविण वानखेडे आदींनी सापळा रचून उमेश दादाराव धोंगडे या संशयितास लॅपटॉपसह ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याच्या ताब्यातुन टि.व्ही.एस. कंपनीची स्कुटी पेप मोपेड गाडी व टि.व्ही.एस. कंपनीची स्टार सीटी मोटारसायकल असा एकुन ९०,०००/- रू किंचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं.२ सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळू शेळके, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विलास गांगुर्डे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ जाधव, प्रविण वानखेडे यांनी केलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version