नारायण रामचंद्र ललवाणी यांचे अल्पशा आजाराने निधन…. गुरुवारी दंडई लॉनस् येथे
पगडी रसम……
नाशिक शहरातील प्रसिद्ध व्यापारी ललवाणी होजियरीचे नारायण रामचंद्र ललवाणी यांचे मंगळवारी ७ मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
होजियरी व्यवसायात त्यांना किंग म्हटले जात. नारायण ललवाणी हे व्यापारी वर्गात नारी शेठ म्हणून ते प्रसिद्ध होते. सामाजिक कार्यात अग्रेसर नारी शेठ अत्यंत प्रेमळ स्वभाचे चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असलेले नारायण शेठ सर्वांना परिचित होते त्यांच्या अचानक जाण्याने कानडे मारुती लेन तसेच व्यापारी वर्गाकडून दुःख व्यक्त करण्यात आले. नारी शेठ हे परिवारासह अयोध्या येथे प्रभू श्रीराम दर्शनासाठी गेले होते, तिथून परत आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने नाशिक येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या दुःखद निधनाने परिवारात आणि व्यापारी वर्गात शोककळा पसरली. नारायण शेठ यांचा अंत्यविधी बुधवारी ८ मे रोजी नाशिक द्वारका साईड येथील अमरधाम येथे करण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते. नारी शेठ सोबत असलेले प्रेमळ नाते संबंधांमुळे श्रध्दांजली देताना अनेकांचे डोळे पाणावले. नारी शेठ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा करण, तीन भाऊ वासुदेव, अशोक आणि हिरो ललवाणी वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे.
नारी शेठ यांची पगडी रसम गुरुवारी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेपर्यंत दंडई लॉनस्, चोपडा लॉनस् जवळ, खैरे एम्पायर, हनुमान वाडी ते जुने गंगापूर रोड पंचवटी नाशिक येथे होणार आहे.