Home क्राईम रोकडोबा वाडी परिसरात युवकाचा धारधार शस्त्राने खून….. एकच खळबळ…. पोलिसांचा धाक संपला...

रोकडोबा वाडी परिसरात युवकाचा धारधार शस्त्राने खून….. एकच खळबळ…. पोलिसांचा धाक संपला का? …. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान

0

रोकडोबा वाडीत युवकाचा धारधार शस्त्राने खून….. एकच खळबळ…. पोलिसांचा धाक संपला का? …. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान…..

Oplus_131072

नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील रोकडोबा वाडीत एका युवकाचा रात्री १२ वाजेच्या सुमारास ४ ते ५ हल्लेखोरांनी युवकाचा खून केला. गोळीबार, कोयत्याने हल्ला, चोरी, सर्रास गावठी मिळून येणे आदी घटनांनी नाशिक शहर हे गुन्हेगारीचे केंद्र बिंदू बनत चालले आहे का? असा सवाल निर्माण होत आहे. अरमान मुनावर शेख वय १८ राहणार सुंदर नगर असे  हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर खून करून फरार झाले.

Oplus_131072

हल्ला झाल्याने अरमान हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. पूर्ववैमनस्यातून वार करून युवकाचा खून करण्यात आल्याचे समजते. खुनाच्या घटनेने परिसरात एकच दहशत पसरली. हत्येची माहिती पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली. घटनेची  माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. नाशिकरोड परिसरात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनांनी नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. गुन्हेगार सर्रास खुन करून दहशत निर्माण करून पोलिसांना थेट आव्हान देत आहेत. नाशिक पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिले नाही का? असा सवाल नागरिक करीत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. आरोपींच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version