दुहेरी हत्याकांडाचा आरोपी अटकेत….. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी…..
दुहेरी हत्याकांडाचा छडा लावून आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
३० एप्रिल रोजी सकाळी ०८.१५ वा.चे पुर्वी मौजे गोळप मुसलमानवाडी गावी ईनामदार यांच्या मालकिचे आंबा बागेमध्ये राखणीसाठी असलेले नेपाळी गुरखे खडकबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ७२ वर्षे व भक्तबहादुर बलराम थापा क्षेत्री, वय ६७ वर्षे दोन्ही रा. लम्की चुहा, नगरपालिका नं. ४, चौरीपुर, कैलाली देश नेपाळ यांना कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन धारदार हत्याराने व दगडाने शरीरावर मारुन, गंभीर दुखापती करुन जीवे ठार मारले होते. आंबा बागायतदार मालक मुसद्दिक मुराद मुकादम रा. गोळप, ता.जि. रत्नागिरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुध्द पुर्णगड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२ गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी विभाग निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन पावस येथे जावुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचया पोलीस पथकाने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, मयतांना माहितगार व्यक्तीने मारल्याबाबत खात्री झाली व वस्तुस्थितीदर्शक पुरावा प्राप्त झाल्याने दोन्ही मयत ज्याठिकाणी मिळुन आले त्याठिकाणचे आजुबाजुच्या परिसरातील आंबा बागायदार तसेच त्यांचेकडे राखणदारी करीता असलेले नेपाळी गुरखे यांचेकडे कसुन चौकशी सुरु केली असता, चौकशीमध्ये यातील मयत यांना गोळप येथील आंबा बागेमध्ये राखणदार करणारा नेपाळी सरणकुमार ऊर्फ गोपाळ क्षतीराम विश्वकर्मा, वय ५८ वर्षे, रा. गाव टिकापुर, नगर परिषद वॉर्ड क्र. १, जि. कैलाली, देश नेपाळ याने तत्कालीक कारणावरुन जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाल्याने संशयिताला ०३ मे रोजी अटक करण्यात आलेली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग निलेश माईनकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, योगेश खोंडे, यांचेसह पुर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धायरकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, विनोद कदम, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, बाळु पालकर, सागर साळवी, अमित कदम, योगेश नार्वेकर, सत्यजित दरेकर,योगेश शेटये, दिपराज पाटील, गणेश सावंत, प्रविण खांबे, अतुल कांबळे, दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांनी केली आहे.