उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन केली कारवाई…..
उपनगर पोलीसांनी दसक शिवारात दोन जणांना गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ताब्यात घेवुन अवैध शस्त्र बाळगणा-यांविरोधी विशेष मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नाशिकरोड येथील दसक शिवारात महालक्ष्मी नगर, गोदा काठा जवळ दोघे युवक गावठी कट्टा व काडतूस बाळगून उभे असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, पंकज कर्पे, सौरभ लोंढे यांनी बुधवारी १ मे रोजी सायंकाळी परिसरात सापळा रचून गोदाकाठी दसक शिवारात संशयित ऋतिक दत्तू लोहकरे २५, रा. धनराज ड नगर, जुना सायखेडा रोड व मयूर राजाराम हिरे २१, रा. महालक्ष्मी नगर, जेलरोड या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे संशयास्पद हालचाली – करतान दिसून आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असता, लोहकरें याने कमरेला गावठी पिस्तूल लावलेले होते. दोघा संशयित यांच्या विरूध्द उपनगर पोलीस ठाण्यास गुन्हा कलम ३/२५, ५/२५ भारतीय हत्यार कायदा अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दि. ०१/०५/२०२४ रोजी महालक्ष्मी नगर, गोदावरी नदीच्या काठी, दसक गाव परीसरात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व काडतूस विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली असता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, पोनि गुन्हे श्री. रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि सचिन चौधरी, पोहवा ४०/विनोंद लखन, पोहवा ३३२/शेख, पोशि पंकज कर्पे, पोशि सौरभ लोंढे असे पथकाने सापळा लावून गावठी पिस्तुल सोबत बाळणारे दोन इसमांना गावठी पिस्तूल व एक काडतूस सह ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी नामे
१) ऋतीक दत्तु लोहकरे वय २५ वर्षे, रा. इच्छामणी गणेश रो हाउस, नं १०, धनराज नगर, जुना सायखेडा रोड जेलरोड नाशिक
२) मयुर राजाराम हिरे वय २१ वर्षे, प्लॉट नं ९, महालक्ष्मी नगर, दसक गाव जेल रोड नाशिक रोड नाशिक यांना अटक केले असून
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विशेष मोहिम अंतर्गत पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, इमरान शेख, पंकज कर्पे, सुरज गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, गौरव गवळी, संदेश रगतवान, सुनिल गायकवाड, सौरभ लोंढे, यांनी केलेली आहे.