353 कलमातून पत्रकारांना वगळण्यात यावे म्हणून निवेदन……
10जुलै रोजी राष्ट्रीय विश्वगामी संघटनेने कलम 353 मधून पत्रकारांना वगळण्यात यावे यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्हात आंदोलन करुन निवेदन दिले.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम , राष्ट्रीय सचिव रमेश देसाई सर व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सर, निर्भीडपणे पत्रकारिता करणार्या पत्रकारांवर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भादंवि कलम 353 चा दुरुपयोग करून पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणार्या प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातआहे.
या कलमातुन पत्रकारांना वगळन्यात यावे यांसह पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात लोकशाही मार्गाने 10 जुलै 2023 रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी अधिकारी यांना राज्यव्यापी ऐक दिवसीय आंदोलन छेडून निवेदन देण्यात आले तसेच राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात आंदोलन करुन निवेदन दिले. पत्रकारांना आंदोलन उपोषण करण्याची वेळ नको कारण देशांचा चौथा स्तंभ धोक्यात आलेला आहे.
बातमी सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या पत्रकारांवर खोटे गुन्हे प्राण घातक हल्ले केले जातात नाही तर 353 गुन्हा दाखल केला जातो तर या कायद्यामधून पत्रकारांना वगळण्यात यावे दखल न घेतल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सरकारला दिला.