पोलिस आयुक्तांच्या हस्ते नाशिकरोड ठाण्यात चोरीस गेलेला मुद्देमाल प्रदान कार्यक्रम…… ९५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादिंना परत……
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सार्थ करीत फिर्यादी यांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले. नाशिक शहरात चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यासाठी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मुद्देमाल प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बुधवारी २४ एप्रिल रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दारणा हॉल मध्ये पोलिस आयुक्तांच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी हस्ते मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे , देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, इंदिरा नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपस्थित होते. परिमंडळ २ अंतर्गत असलेल्या एकूण सहा पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आले. अंबड, सातपूर, इंदिरा नगर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलिस ठाणे हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाल्याने फिर्यादी नागरिकांनी पोलिस आयुक्तांच्या आभार मानले.
नागरिकांची एखादी वस्तू चोरीस गेली की त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो, चोरीस गेलेले मुद्देमाल परत मिळणार की नाही याबाबत साशंकता असतेच शिवाय फिर्याद करावी की नाही याबाबत अनेकदा घरच्यांमध्ये दुमत असते पण पोलिसांनी चोरांचे बंदोबस्त करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. सहा पोलिस ठाणे हद्दीतील जप्त केलेले एकूण ९५ लाख ३० हजार ६०० रुपयांचे ७५ फिर्यादिंना मुद्देमाल यावेळी परत करण्यात आले. यामध्ये सोन्याचे दागिने, मोटार सायकल, टीव्ही, लॅपटॉप, मंदिराची मूर्ती आदी चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून मूळ फर्यदिंना परत करण्यात आले. यामध्ये सातपूर ६३८२०९, इंदिरा नगर १४३७२१४, अंबड १०८७८८०, नाशिकरोड २८२२७५८, देवळाली कॅम्प ६५२५४०, उपनगर २९२२००० या सहा पोलिस ठाणे हद्दीतील एकूण ९५ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे केलेल्या कामगिरी बद्दल कौतुक केले.