पीपल्स रिपब्लिकन पार्टीला नाशिक लोकसभेची जागा सोडण्याची मागणी….
अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेचा टिळा,तीढा हा सुटेनाचा झाला असल्याकारणाने तसेच जनतेच्या मानसिकतेच्या विचार करण्याच्या भावनेतून आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला. नाशिक लोकसभा ही जागा पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सोडावी व या जागेसाठी आमचा हक्क घटक पक्ष म्हणून आम्ही महायुतीकडे मागणी करत आहोत तसेच या जागेसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे हे निवडणूक लढणार असून येत्या दोन दिवसात ते आपला उमेदवारी अर्ज नाशिक निवडणूक कार्यालय मध्ये दाखल करणार आहेत.
अशी आंबेडकरी आणि रिपब्लिकन जनतेची मागणी आहे त्यामुळे ही जागा आम्हाला न सुटल्यास आम्ही ती जागा लढून जिंकून आणण्याचं धाडस कार्यकर्त्यांनी आपल्या मनामध्ये बाळगले आहे त्यामुळे ही निवडणूक पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांनी सांगितले.