Home ताज्या बातम्या मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी...

मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांची पोलिस ठाण्यात फिर्याद….. नोव्हेंबर महिन्यात सावकारांच्या जाचास कंटाळून केली होती आत्महत्या……

0

मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांची पोलिस ठाण्यात फिर्याद….. नोव्हेंबर महिन्यात सावकारांच्या जाचास कंटाळून केली होती आत्महत्या……

 

नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी २ नोव्हेंबर२०२३ रोजी संसारी रेल्वे गेट जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. फसवणूक प्रकरणात मनोहर कारडा यांचेही नाव असल्याने ते अत्यंत मानसिक तणावाखाली असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती. मनोहर कारडा यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे हे गूढच होते. दिवंगत मनोहर कारडा यांच्या आत्महत्येला पाच महिने उलटली, पत्नी भारती कारडा काही दिवसांपूर्वी घरात साफसफाई करीत असताना दिवंगत पती मनोहर कारडा यांची डायरी त्यांना सापडली. डायरी वाचत असताना भारती कारडा यांना मनोहर कारडा यांना १९ सावकारांनी दिलेल्या मानसिक त्रास आणि जाचामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख डायरी मध्ये लिहलेले दिसून आल्याने धक्काच बसला.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ जणांचे नाव डायरी मध्ये असल्याची  माहिती दिवंगत मनोहर कारडा यांच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केली आहे.  या १९ व्यक्तींनी आम्हाला आर्थिक व्यवहारात अव्याच्या – सव्या दराने व्याज वसूल करीत आम्हाला मानसिक त्रास दिला आहे आणि त्यांच्या जाचाला कंटाळून  मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली असल्याचा उल्लेख आहे. मनोहर कारडा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्व १९ जणांवर भादवी कलम ३०६, ३८४, ३८६, ३८७ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून पत्नी भारती कारडा यांनी नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद अर्ज दिले आहे. सर्व १९ सावकारांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल का?  नाशिक पोलीस आयुक्त  संदीप कर्णिक हे या प्रकरणी या सावकारांवर कायदेशीर कारवाई करतील व मला न्याय देतील असा मला विश्वास भारती कारडा यांनी व्यक्त केले आहे.

या सावकारांकडून माझ्या परिवारास संपवण्याच्या हि धमक्या दिल्या जात असून त्यांच्या वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून माझ्या परिवारातील अजून कोणी असेच पाऊल उचलतील याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती दिवंगत मनोहर कारडा यांची पत्नी भारती कारडा यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version