जेल रोडला सम्राट अशोक जयंती साजरी…..
शिवाजी नगर जेल रोड नाशिक रोड येथे सम्राट सामाजिक प्रबोधन संस्था यांच्या वतीने साला बाद प्रमाणे सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे (उबाठा) चे विनोद घरटे यांनी आपल्या भाषणात अशोक सम्राट यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती दिली.
प्रमोद साखरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की सम्राट अशोक यांचे महान कार्य भारत देशासाठी मोठे योगदान दिले आहे. कार्यक्रमात सम्राट सामाजिक प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष राऊत यांनी सूत्रसंचालन केले, एकलहरा विद्युत केंद्राचे अभियंते सुरेश वाडमारे यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोक यांचे राजकीय व्यवस्था कशी होती, स्थापत्य कला फारच सुंदर आणि विकसित होती, लोक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या होत्या, संपूर्ण देशात विकास आराखडा तयार करण्यात आला होता,भारत देशाला जम्बुदिप म्हणून ओळखल्या जात होते, विश्वगुरु म्हणुन देशाला ओळख झाली होती.
कार्यक्रमात समाज कल्याण महिला विकास बालकल्याण विभागाचे शंकर वाघमारे, महानगरपालिकेचे अधिकारी बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते प्रमोद साखरे,
सुरेश वडमारे, विनोद घरटे, शशी भालेराव, शंकर वाघमारे, सुभाष राऊत आदी उपस्थित होते.