चोरीचा गुन्हा उघडकीस ९ लाख ३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त……. गुन्हे शाखा- २ ची उल्लेखनीय कामगीरी
जेलरोड येथे राहणाऱ्या रामदास सुदात दोडके यांनी मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम संशयित गुरुजी उर्फ गोपाल महाराज मूळ नाव मेहुल संजय डोंगरे या साधूने १० मार्च रोजी चोरून पळ काढला होता. डल्ला मारणाऱ्या साधू महाराजला पोलिसांनी बुलढाणा येथून ताब्यात घेतले आहे. पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेशाखा युनिट २ च्या पथकाने १० मार्च रोजी नाशिकरोड पोलिस ठाण्यातील भा.द.वि. कलम ३८० दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हयातील संशयित आरोपी गुरूजी उर्फ गोपाल महाराज मुळ नाव मेहुल संजय डोंगरे वय-३१ वर्षे रा. दरेगांव, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा यास सिंदखेडराजा येथुन ताब्यात घेतले आहे.
संशयिताकडून त्याच्या कब्जातुन मारूती स्विप्ट कार क्रमांक एम. एच.०४ जीई ८३१० -, सोन्याची अंगठी, गहु मणी, सोन्याची अंगठी आदी मिळून एकूण ९,०३,०००/- रू किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे.सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं. २ कडील सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके, शंकर काळे, नंदु नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, विलास गांगुर्डे, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, संजय सानप, प्रकाश बोडके, सोमनाथ जाधव, नेहा सुर्यवंशी, रूमाले व टीम यांनी केलेली आहे.