देशी बनावटीचे पिस्टल व ०३ काडतुसांसह संशयितांवर कारवाई,…….
नाशिक गुन्हेशाखा विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी……
२२ मार्च रोजी १८:३० वाजेच्या सुमारास भगवान जाधव व दत्ता चकोर यांना संशयित योगेश प्रल्हाद आहेर हा आशिर्वाद बिल्डींगचे जवळ येणार असून त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती मिळाल्याने त्वरित पोलिस उप निरीक्षक मुक्तेश्वर लाड, पोलिस उप निरीक्षक दिलीप सगळे, चकोर, सोनवणे, निकम, जाधव यांनी पळसे, नाशिकरोड येथील आशिर्वाद बिल्डींगचे आजुबाजूस सापळा रचून थांबले असता, १९:३० वाजेचे एक संशयित पायी चालत येतांना योगेश प्रल्हाद आहेर, वय ३९ वर्षे, राह. मगर मळा, रेल्वे ट्रॅक्क्षन गेट जवळ, एकलहरा रोड, नाशिक रोड, या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ४३,०००/- रू किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल ०३ जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे विशेष पथकाचे भगवान एकनाथ जाधव यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून शस्त्र अधिनियम कलम ३/२५, सह मपोका १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस उप निरीक्षक लाड, श्रेणी पोलिस उप निरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलिस उप निरीक्षक रंजन बेंडाळे, किशोर रोकडे, गणेश भामरे, डंबाळे, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, रविंद्र दिघे, दत्ता चकोर, अनिरूध्द येवले, बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, चारूदत्त निकम, राऊत, विठ्ठल चव्हाण विशेष पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर या पथकाने कामगिरी केलेली आहे.